Posts

Showing posts from September, 2015

हितगुज स्वत:शीच

अशीच एका लांबच्या ओळखीच्या लग्नाला खूप उशिरा पोहोचले. मुहूर्त तर साधलाच नाही, पण सुलग्नसुद्धा आटोपलेलं होतं. स्टेजवरच्या मंडळींची पांगापांग झालेली, वधू-वर कपडे बदलायला गेलेले आणि एका कोपर्‍यात सजवलेल्या मखरात गुुरुजींची होमाची तयारी सुरू झालेली होती. मी वर पक्षाकडून हजेरी लावली होती, पण वराचे आई-वडीलही अदृश्य होते. कुणीतरी ओळखीचं भेटेस्तोवर आणि हातातलं पाकीट देईस्तोवर थांबणं भाग होतं. मग काय मी एका कोपर्‍यातली खुर्ची गाठली आणि निवांतपणे सारी लगबग दुरूनच न्याहाळू लागले. कुठे अहेर देणी-घेणी सुरू होती, कुठे गप्पाष्टक रंगले होते, स्टेजवर लहान मुलांची अक्षता वेचून पुन्हा फेकाफेक सुरू होती, तर शेजारच्या जेवणाच्या हॉलमध्ये विहिणीच्या पंगतीची सजावट सुरू झाली होती. समारंभात असूनही नसण्याचा एक वेगळाच अनुभव घेत मी साक्षीभावानं सोहळा पाहात होते, मला मजा यायला लागली. ‘वर पक्षाकडील मंगळसूत्र आणा’ गुरुजींचा आवाज आला. कुणीतरी लगबगीनं उठलं. पण मंगळसूत्र खूप वेळ आलंच नाही. अचानक कुजबुज सुरू झाली. काहीतरी हरवल्याचा गोंधळ, चेहर्‍यांवर प्रचंड ताण, शोधाशोध, चिंता, त्रागा या सार्‍यानं वातावरण तंग झाल

श्रीमद्भगवद्गीतेतील व्यवस्थापनकौशल्य

‘सद्य:स्थितीत श्रीमद्भगवद्गीतेतील प्रबंधन विधीची प्रांसगिकता’ या आगळ्या वेगळ्या विषयावर राष्ट्रीय परिषद आयोजित केल्याबद्दल सर्वप्रथम आर. एस. मुंडले धरमपेठ कला वाणिज्य महाविद्यालयाचे मन:पूर्वक अभिनंदन! या परिषदेच्या निमित्ताने, व्यावसायिक दृष्टिकोनातून अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या व्यवस्थापन या विषयाचं मंथन गीतेतील श्रीकृष्णार्जुन संवादाच्या माध्यमातून घडवून आणण्याचा ‘धाडसी उपक्रम’ यशस्वी झाला. धाडसी यासाठी म्हणावंसं वाटतं कारण गीतेबद्दल समाजात अनेक सजम-गैरसमज रूढ झाले आहेत. गीतेतील अध्यात्मशास्त्र, मानसशास्त्र, नीतिशास्त्र याबद्दल मंथन-चर्चा होताना फार पूर्वीपासून दिसते. त्यामुळेच बरेचदा गीतेतल शाश्‍वत ज्ञानाचा प्रवाह थोर तत्त्वज्ञानी, वयोवृद्ध, चिंतकांपर्यंतच मर्यादित राहून, राष्ट्राचा खरा आधारस्तंभ असलेली तरुण पिढी मात्र गीतेपासून दूरच आहे, हे जाणवतं. गीता हा ग्रंथ सारे भोग भोगून झाल्यावर म्हातारपणी वाचण्यासाठी असून तरुणपणी वाचल्यास मुलं संन्यासी होतील असल्या भ्रामक कल्पनांमुळे देखील युवा पिढी गीतेचा अभ्यास करताना दिसत नाही. व्यवस्थापनाच्या परिपेक्षातून गीतेचं मंथन घडवू

शीतल प्रकाश!

आपल्या पृथ्वीवर सूर्य, चंद्र आणि दूरवर चमकणार्‍या तारकांतून नैसर्गिक प्रकाश येतो. क्वचित लखलखणारी वीजदेखील क्षणभर प्रकाश देऊन जाते. गारगोटींच्या घर्षणातून ठिणग्या व ज्वालाग्राही पदार्थातून मानवनिर्मित अग्नीद्वारेदेखील प्रकाश मिळतो. यातून मग कंदील, मिणमिणणारी चिमणी, मेणबत्ती, समईसारखी इंधन जाळून प्रकाश देणारी उपकरणे मानवाने तयार करून अनेक वर्षे वापरली. पुढे १८३० च्या दरम्यान चुंबकीय प्रभावातून धातुतंत्रीतून वाहणार्‍या विजेचा शोध लागल्यानंतर मात्र विद्युत उर्जेतून सुनियंत्रित प्रकाश मिळण्याची सोय झाली. १८९० च्या दरम्यान या उर्जेद्वारा तापविलेल्या विशिष्ट धातूच्या तारेतून कृत्रिम प्रकाश देणार्‍या काचेच्या बल्बचा वापर सुरू झाला, जो आजतागतदेखील बर्‍याच प्रमाणात सर्वत्र सुरू आहे. ज्याप्रमाणे सूर्याचा प्रकाश प्रखर, तापदायक तर चंद्र-तारकांचा चांदणी प्रकाश शीतल असतो, त्याप्रमाणे खूप तापणार्‍या विजेच्या बल्बऐवजी कमी प्रमाणात तापून शीतल प्रकाश देणार्‍या दिव्यांचा शोध घेणे सुरू झाले. यातूनच विद्युत भारवाहक कणांच्या फास्फरस् थरावर होणार्‍या मार्‍यामुळे प्रकाश देणारी ट्यूबलाईट व तिचे लघुरूप म्ह