Posts

Showing posts from 2016

अर्थाचा अनर्थ

अर्थाचा अनर्थ अर्थशास्त्र शिकताना आम्हा, भौतिकतेचे मृगजळ दिसले । पंथ सुखाचा समजून आम्ही, त्या स्वप्नाला मनी वसविले ।। त्या स्वप्नाच्या मागे पळता, मनात अमुच्या स्वार्थ जागला । 'मी अन माझे' ह्या धुंदीतच, हृदयातिल परमार्थ संपला ।। अर्थाचा हव्यास सरेना,कितीहि मिळता पोट भरेना । अर्थासाठी धडपडताना, समाधान आम्हास मिळेना ।। इतरांशी करताना स्पर्धा, मनःशांतिही हरवुन बसलो । दुसऱ्याचे यश सदा आठवत, ईर्षेच्या गर्तेतहि फसलो ।। नाती गोती नष्ट जाहली, बुद्धी अमुची भ्रष्ट जाहली । परस्परातिल विश्वासाची, शुद्ध भावना कलुषित झाली ।। अर्थासाठी भाऊबंदकी, अर्थासाठी कोर्टकचेऱ्या । या अर्थाला खेचून नेण्या, खून दरोडे मारामाऱ्या ।। विविधरंगि जीवनात अपुल्या, अर्थाला मर्यादा आहे । कांचन-मृग परि मनात वसता, सौख्य घराचे हरवू पाहे ।। कर्तृत्वाची अनंत शिखरे, खुणावती घेण्यास भरारी । परि अर्थाच्या वेडापायी, मर्यादित हो क्षमता सारी ।। प्रेम, दया अन श्रद्धा भक्ती, समाज अपुला अपुली माती । लुप्त जाहल्या माया ममता, जगी न उरली सभ्य संस्कृती ।। सत्य, शुद्धता अन गुण

बुद्ध कि जय हो (गीत)

बुद्ध कि जय हो, बुद्ध कि जय हो। तथागत प्रभु , बुद्ध कि जय हो॥धृ॥ शुध्दोधन सुत गौतम जय हो, मायादेवी नंदन जय हो। बोधिवृक्षतल ज्ञानविजेता, तव चिंतन मे मन तन्मय हो॥१॥ काम-क्रोध-मद-मोह छोडकर, सुखशांती की सदा विजय हो। सत्य-अहिंसा-बंधु भाव मे, लोभ-क्षोभ का पूर्ण विलय हो॥२॥ जरा-मृत्यु-पीडा का भय हर, मन सबका ही अब निर्भय हो। चरणों मे तव नतमस्तक बन, यह जग सारा मंगलमय हो॥३॥ -अशोक वर्णेकर